स्थैर्य, फलटण, दि.८: आई प्रतिष्ठान, वाठार निंबाळकर या सामाजिक संस्थेने कोव्हीड १९ जनजागृतीसाठी “माझे कुटुंब माझी जबाबदारी” यावर आधारित सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेचे ऑनलाइन आयोजन केलेले होते. या स्पर्धेमध्ये ५०० हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला असून अजूनही ही सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा काही दिवस चालू राहणार आहे. स्पर्धेत सहभाग घेतलेल्या यशस्वी सर्व स्पर्धकांना त्यांच्या ई-मेल द्वारे ऑनलाईन प्रमाणपत्र सेंड करण्यात आलेली आहेत. कोव्हीड १९ चा प्रादुर्भावा मध्ये कशाप्रकारे सर्वांनी काळजी घ्यायची यासंदर्भात काही प्रश्न विचारले होते. या स्पर्धेतील प्रश्ननिर्मिती नितीन आत्माराम जाधव ता. जावली यांनी तयार केली होती. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील शिक्षक, पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी यांनी सहभाग घेतला होता. तसेच प्रत्येक कुटुंबाने आपली जबाबदारी ओळखली तर लवकरच आपण कोरोना सारख्या महामारी पासून लवकरच मुक्त होऊ असा विश्वास आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष व उपक्रमशील शिक्षक गणेश तांबे यांनी व्यक्त केला.