दैनिक स्थैर्य । दि. ०५ जुलै २०२२ । फलटण । चिले देवांप्रति असलेल्या सदभक्तीचे विशेष प्रमाण म्हणजे ज्ञानतेज अंक. सदरील अंकाचे मोठ्या उत्साहात फलटणमध्ये प्रकाशन करण्यात आले.
ज्ञानतेज अंकाचे हितचिंतक किरकिरे सर, संजय माळवे, भगवान दादा व मयूर परदेशी, पाठक सर, पप्पू अवघडे यांच्यासह ओम दत्त चिले ओम भजनी मंडळाचे सदस्य यांनी माऊलींचा पालखी सोहळा फलटणमध्ये विसावला असतानाही ज्ञानतेज अंकाच्या प्रकाशनाचा सोहळा यशस्वी केला, त्याबद्दल त्यांचे कौतुक केले
या सोहळ्याचे आणखी एक विशेष म्हणजे, अंकाचे लेखक या नात्याने लाभलेली ह.भ.प. सौ. पुष्पाताई कदम आणि प्रा. रविंद्र कोकरे सरांची उपस्थिती होती.
ती ज्ञानतेजच्या सर्वांसाठी प्रेरणादायी राहणार आहे. तर देवांवर सहृदय श्रद्धा ठेवणारे, कायम सत्कर्माच्या पाठीशी उभे राहणारे मा. डॉ. जोशी, डॉ. राऊत, यांच्यासह अनेकांनी वेळात वेळ काढून या उपक्रमात नोंदविलेला सहभाग हा आमच्या पंखात बळ भरणारा ठरणार आहे.