दैनिक स्थैर्य । दि. २८ मे २०२२ । सातारा । शिवथर येथे एका घरासमोर नवजात अर्भक मृत अवस्थेत आढळल्याने गावात खळबळ माजली. हे अर्भक कुणाचे आणि याचा मृत्यू कसा झाला असे अनेक प्रश्न ग्रामस्थांना भेडसावू लागले आहेत. दरम्यान या प्रकरणाचा सातारा तालुका पोलीस तपास करीत आहेत.
शिवथर येथील भर वस्तीत असणा-या एका घराच्या दरवाज्याजवळ मृत अर्भक आढळल्याची वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे घटनास्थळी ग्रामस्थांची गर्दी झाली. या घटनेची माहिती सातारा तालुका पोलीस ठाण्यात कळल्यानंतर पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल पाेहचली.
सातारा तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित चौधरी, पीएसी दळवी व त्यांचे सहकारी यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. प्राथमिक आरोग्य उपकेंद्र शिवथर येथील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार अंदाजे नऊ महिन्याचे अर्भक आहे. या अर्भकाचा मृत्यू झालेला आहे.