
दैनिक स्थैर्य | दि. 24 मार्च 2025 | फलटण | माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात कोळकी गावाचा राखडेलला विकास मार्गी लावण्याचे कामकाज आपण सर्वांनी मिळून करणे आवश्यक आहे. कोळकी गावामध्ये भाजपाची ताकद आता वाढली आहे. येणाऱ्या काही महिन्यात कोळकी ग्रामपंचातीची निवडणूक संपन्न होणार आहे. त्यावेळी आपण सर्वांनी “एकच ध्यास, कोळकी गावचा विकास” हे ब्रीदवाक्य डोळ्यासमोर ठेवून कामकाज करणे गरजेचे आहे, असे मत, भाजपा नेते जयकुमार शिंदे यांनी व्यक्त केले.
कोळकी येथे भाजपामध्ये नव्याने प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांना पक्ष कार्याबद्दल माहिती देण्यासाठी जयकुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक बोलवण्यात आली होती. त्यावेळी जयकुमार शिंदे बोलत होते. यावेळी फलटण पंचायत समितीचे माजी सदस्य सचिन रणवरे, माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य विकास नाळे, युवा नेते संजय देशमुख, उदयसिंह (बबलु) निंबाळकर, कामगार नेते बाळासाहेब काशीद, ग्रामपंचायत सदस्या सौ. लक्ष्मीदेवी उदयसिंह निंबाळकर, सौ. प्रियांका सागर चव्हाण यांच्यासह विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना सचिन रणवरे म्हणाले कि, कोळकी गावचा विकास करण्यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात कामकाज करण्याचा निर्णय गत काही दिवसांपूर्वी घेण्यात आला आहे. त्याचवेळी माजी खासदार रणजितसिंह यांनी कोळकी गावाचा सर्वात मोठा प्रश्न असलेल्या पाणी प्रश्नवर तातडीने तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. यासोबतच कोळकी गावच्या सर्वांगीण विकासासाठी माजी खासदार रणजितसिंह यांनी आपण कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले आहे.
यासोबतच माजी उपसरपंच विकास नाळे, युवा नेते संजय देशमुख, उदयसिंह (बबलु) निंबाळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.