तालुक्यातील क्रिडा क्षेत्रातील तरुणांना सर्वतोपरी सहकार्य : श्रीमंत विश्वजीतराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १० डिसेंबर २०२१ । फलटण । तालुक्यातील भाडळी बु.।। येथील सर्वसामान्य कुटुंबातील चि. प्रसाद जाधव याने “ऑल इंडिया स्पोर्ट्स फेडरेशन”च्या वतीने घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धामध्ये 19 वर्षांच्या खाली वयोगटात “लांब उडी” या खेळामध्ये प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदक गवसल्याबद्दल पंचायत समितीचे नवनिर्वाचित सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांनी पाठीवर कौतुकाची थाप मारून आगामी काळामध्ये फलटण तालुक्यातील क्रिडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तरुणांना यापुढे सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही यावेळी श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.

“लांब उडी” या खेळप्रकारामध्ये नेपाळ या देशांमध्ये “पोखरा” येथे प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक पटकावले. या यशाबद्दल फलटण पंचायत समितीचे सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांनी प्रसाद जाधव यांचा यथोचित सन्मान केला. त्यावेळी श्रीमंत विश्वजीतराजे बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती संजय सोडमिसे, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब ठोंबरे, बाजार समिती उपसभापती भगवान होळकर, संचालक चांगदेव खरात, रामदास कदम, बाजार समिती सचिव शंकरराव सोनवलकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष जयकुमार इंगळे, बाजार समितीच्या आरोग्य समितीचे सदस्य, राष्ट्रवादी युवक तसेच विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!