महानुभाव आश्रम तरडगाव येथे प्रतिवर्षाप्रमाणे ब्रम्हविद्या ज्ञानामृत व्याख्यानमालेचे दि. १७ ते २५ ऑक्टोबर दरम्यान आयोजन


 

स्थैर्य, फलटण दि. १३ : महानुभाव आश्रम, तरडगाव, ता. फलटण येथील ब्राम्हविद्या पाठशाळेच्या माध्यमातून प्रतिवर्षाप्रमाणे शनिवार दि. १७ ते रविवार दि. २५ ऑक्टोबर दरम्यान श्री ब्राम्हविद्या ज्ञानामृत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येत आहे.

स्व. आचार्या तपोनिधी गुरुमाऊली माई कपाटे यांच्या प्रेरणेने महानुभाव आश्रम संस्थेचे संचालक आचार्यप्रवर गुरुवर्य प. पू. प. म. श्री राहेरकर बाबाजी गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री ब्रम्हविद्या व्याख्यानमालेचे आयोजन प्रतिवर्षी करण्यात येत असून यावर्षी व्याख्यानमालेचे ११ वे वर्ष आहे. प्रतिवर्षी या व्याख्यानमालेचे माध्यमातून चातुर्मासातीतील उत्तरार्ध काळात ज्ञानरुप विचारांचे विशेष पर्व ब्रम्हविद्या ज्ञानचिंतन समितीद्वारे करण्यात येते, यावर्षी एकूण ९ सत्र संपन्न होणार असून प्रतिवर्षाप्रमाणे प्राचीन लीळा चरित्र, श्रीमदभगवद गीता, श्रीकृष्ण चरित्र, स्मृतीस्थळ व सप्तकाव्ये अशा विविध ग्रंथातील महत्वपूर्ण विषयावर व्याख्यानमालेच्या माध्यमातून व्याख्याते बोलणार आहेत.

सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचे अवतरण अष्टशताब्दी वर्षाचे औचित्य साधून त्यांच्या जीवन चरित्रावरील विविध विषयांवर आश्रमातील साधक, साध्वी, विद्यार्थी, विद्यार्थिनी अभ्यासपूर्ण चिंतनशील विचार सादर करणार आहेत. या प्रत्येक विषयावर आचार्य गुरुवर्य श्री बाबाजी यांचे मार्गदर्शनपर अध्यक्षीय प्रबोधन होणार आहे.

व्याख्यानमालेच्या माध्यमातून सर्वसमावेशक विचारातून महानुभाव पंथासाठी एक उत्तम, अष्टपैलू व्याख्याता घडावा, सक्षम व स्वयंपूर्ण व्याख्याता घडविताना विचारांची परिपक्वता तयार होऊन पंथासह समाजसेवेसाठी सर्वोत्तम साधक विद्यार्थी व्यासपीठावर उभा रहावा या उद्देशाने या व्याख्यानमालेचे आयोजन प्रतिवर्षी करण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अशा प्रबोधनात्मक कार्यातून समाजहित साधत समाज घडविण्यासाठी महानुभाव आश्रम संस्था, तरडगाव कार्यरत असल्याचे श्री ब्रम्हविद्या ज्ञानचिंतन समितीच्यावतीने सांगण्यात आले आहे


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!