प्रत्येक खेळाडूंनी ऑलम्पिक चे स्वप्न पहा : शर्मिला पवार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.२९ मार्च २०२२ । बारामती । राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय स्पर्धे मध्ये यश मिळवण्यासाठी प्रत्येक खेळाडूंनी मेहनत केलीच पाहिजे व ऑलम्पिक मध्ये यश मिळवण्याचे स्वप्न पाहून ते स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नशील रहा असे प्रतिपादन शरयु फौंडेशन च्या अध्यक्षा शर्मिला पवार यांनी केले. कराटे असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने बारामती कराटे असोसिएशनला या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन देण्यात आले होते त्याचा शुभारंभ शर्मिला पवार यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी त्या बोलत होत्या या वेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे,उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे,तालुका क्रीडाधिकारी जगन्नाथ लकडे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कार्यकारी अधिकारी हनुमंत पाटील,इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक चे अध्यक्ष शुभम निंबाळकर,सिमरन तांबोळी,विक्रम निंबाळकर,रियाझ शेख व स्पोर्ट्स कराटे वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष परमजित सिंह आदी मान्यवरासह शरयू फौंडेशनचे सर्व सदस्य उपस्थित होते.

ग्रामीण भागातील खेळाडूंना कराटे खेळाच्या माध्यमातून हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून सदर स्पर्धेचे आयोजन केल्याचे बारामती कराटे असोसिएशनचे प्रमुख प्रशिक्षक व कराटे असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे सचिव रविंद्र कराळे यांनी सांगितले दोन दिवसांच्या स्पर्धेमध्ये राज्यातील ७०० हुन अधिक खेळाडूंनी प्रात्याक्षिक व फाईट मध्ये सहभाग घेतला यामध्ये प्रात्यक्षिक प्रकारचा प्रथम क्रमांक पिंपरी चिंचवडच्या प्रतिम इचके तर फाईट प्रकारामधील प्रथम क्रमांक कोल्हापूरच्या यासिन झांबरे व टीम ने पटकावला प्रात्यक्षिक द्वितीय क्रमांक पुणे ग्रामीण रवींद्र कराळे टीम व फाईट प्रकारामध्ये शरद फ़ंड टीम तृतीय तसेच चतुर्थ क्रमांक संतोष मोहिते टीम सातारा,प्रभू भीमदे टीम सोलापूर,तर उतेजनार्थ 5व्या क्रमांकाचा चषक महेश भोकरे सांगली व अमित ठाकूर टीम पुणे शहर तसेच विनय बोढे याच्या टीम चंद्रपूर यांनी विजेतेपद मिळविले सूत्रसंचालक अनिल सावळेपाटील यांनी केले आभार अभिमन्यू इंगवले यांनी मानले


Back to top button
Don`t copy text!