
दैनिक स्थैर्य । दि. 26 मे 2025 । फलटण । फलटण शहरासह तालुक्यामध्ये संततधार व मुसळधार पावसामुळे जी पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे, त्याचे निवारण करण्यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील हे जनतेच्या सवेसाठी तत्पर असल्याचे त्यांनी कृतीतुन दाखवुन दिले आहे.
फलटण शहरामध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्वत: पायी दौरा केला तर सर्व कार्यकर्तांना अॅक्टिव्ह राहण्याचे निर्देश सुध्दा त्यांनी दिले होते. यासोबत सोशल मिडीयाच्या माध्यमातुन स्वत:चा पर्सनल मोबाईल नंबर सुध्दा शेअर करत कधीही कसल्याही मदतीसाठी आपण तत्पर असल्याचे स्पष्ट केले होते.
यासोबतच आमदार सचिन पाटील हे रविवार दि. 25 मे रोजी सकाळी 6 वाजल्यापासुन फलटण तालुक्याच्या विविध भागांचा दौरा केला. त्यामध्ये प्रामुख्याने सर्वसामन्य शेतकर्यांचे झालेल्या नुकसानाची पाहणी हि बांदावर जात केली. तालुका प्रशासनाला सोबत ठेवत जागीच पंचनामे करण्याचे व आवश्यक त्या ठिकाणी मदत पोहचवण्याचे निर्देश सुध्दा फलटण त्यांनी यावेळी दिले.
आमदार सचिन पाटील यांच्यासोबत फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, निवासी नायब तहसीलदार अभिजीत सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.