कोंबडा आरवला नाही तरी सकाळ व्हायची थांबत नाही आणि झोपला तरी सकाळ व्हायची थांबत नाही, नवाब मलिकांचा फडणवीसांना टोला

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, दि. २०: राज्यातील अनेक भागांमध्ये परतीच्या पावासने थैमान घातलं. यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणा नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते आणि इतरही मंत्र्यांचे दौरे सुरू आहे. दरम्यान यावरुन राजकारणत तापले आहे. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावरुन महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती. फडणवीसांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांनी प्रत्युत्तर दिले आहे.

देवेंद्र फडणवीस हे कालपासून नुकसानग्रस्त भागांचा दौरा करत आहे. यावेळी ते म्हणाले की, माझ्यामुळे इतर पक्षाचे लोक बाहेर फिरायला लागले अशी टीका त्यांनी केली होती. यावरर नवाब मिलांनी उत्तर दिले आहे. ‘कोंबडा आरवला नाही तरी सकाळ व्हायची थांबत नाही आणि झोपला तरी सकाळ होण्याचे थांबत नाही अशी अवस्था देवेंद्र फडणवीस यांची झालीय.’ असा टोला त्यांनी लगावला आहे. ट्विट करत त्यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिले.

तसेच पुढे बोलताना मलिक म्हणाले की, शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आम्ही सरकारकडे नुकसान भरपाई देण्याची मागणी करणार असल्याचे ते म्हणाले. तसेच मुख्यमंत्र्यांनीही पाहणी दौरा केला आहे. राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची भूमिका महाराष्ट्र सरकारची राहणार आहेत, लवकरच मदत जाहीर करण्यात येईल. केंद्र सरकारनेही मदत करण्याची जबाबदारी घ्यावी, राज्य सरकारच्या कॅबिनेटमध्ये मदतीसाठी निर्णय घेतला जाईल असेही मलिक म्हणाले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!