दैनिक स्थैर्य । दि. १४ जुलै २०२२ । मुंबई । संघ प्रमुख मोहन भागवत यांनी श्री सत्य साई यूनिव्हर्सिटी फॉर ह्युमन एक्सिलेन्सच्या पहिल्या दीक्षांत समारंभाला हजेरी लावली. तेथील भाषणात भागवतांनी अनेक मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केलं. धर्मांतराचाही उल्लेख करत त्यांनी लोकसंख्येवरही मोठं विधान केलंय.
खाणं आणि जन्माला घालणं ही कामं तर जनावरंही करतात. जंगलात सर्वाधिक शक्तीशाली झालं पाहिजे. मात्र, इतरांना मदत करणं ही मानवाची ओळख आहे, असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलंय. भविष्यातील अभ्यास आणि भुतकाळातील ज्ञानाचा आधार सोबत घेऊन भारताला पुढं नेण्याचे संकेत मिळत आहेत. भारत प्रगती करेल असं दहा बारा वर्षापूर्वी कुणी म्हटलं असतं तर त्याला आम्ही गंभीरपणे घेतलं नसतं. 1857 पासून ही प्रक्रिया सुरू झाली. स्वामी विवेकानंदांनी ती पुढं नेकली. अध्यात्माद्वारे श्रेष्ठत्व प्राप्त केलं जाऊ शकतं. कारण, विज्ञान अजून सृष्टीतील स्त्रोताला समजून घेऊ शकलेलं नाही, असं भागवत म्हणाले.