
दैनिक स्थैर्य । दि. १६ नोव्हेम्बर २०२२ । मुंबई । भारतातील भावी इलेक्ट्रिक मोबिलिटी सोल्यूशन्सचा चेहरा म्हणून झेडएस ईव्हीला प्रशंसित करत एमजी मुंबईने आज झेडएस ईव्ही मालकांसाठी ईव्ही ड्राइव्हचे आयोजन केले. ईव्ही ड्राइव्ह भारतात ईव्हींच्या अवलंबतेला चालना देण्याप्रती ऑटोमेकरच्या सातत्यपूर्ण कटिबद्धतेशी संलग्न होते आणि विस्तार करत ब्रॅण्डचे देशातील स्थिरता, विविधता व समुदाय-केंद्रित प्रयत्नांना प्रेरित करण्यावर लक्ष केंद्रित आहे. या ड्राइव्हमध्ये एमजी झेडएस ईव्ही मालकांची नोंदणी दिसण्यात आली, ज्यांना भारतातील ईव्ही क्रांतीचा भाग असण्याचा अभिमान होता.
एमजी सेवाचा भाग म्हणून फेसबुक व व्हॉट्सअॅपवर अर्धदशलक्ष महिलांशी संलग्न असलेला आणि सध्या जगातील २२ प्रमुख ठिकाणी उपस्थित असलेला जगातील मातांचा सर्वात मोठा समुदाय युनिमो (UNIMO) सोबत संयुक्त विद्यमाने एका विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाने चार महिला उद्योजकांना अधिक मान्यता आणि समर्थन प्रदान केले, ज्या पुनर्चक्रण आणि पुनर्वापराद्वारे शाश्वत व्यवसाय मॉडेलला प्रोत्साहन देण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत.
सत्कार करण्यात आलेल्या इको-प्रीन्युअर्स आहेत प्रतिभा पाटील व विखे पुर्से, या दोघीही टाकाऊपासून बनवलेल्या वस्तू विकतात. ग्रामीण बचत गटांसोबत कमी किंमतीत, पर्यावरणपूरक सॅनिटरी पॅड बनवण्यासाठी काम करणाऱ्या वैशाली सुभाष बाजारे आणि टाकाऊ फुलांचा वापर करून अगरबत्ती बनवणारे २००० बचत गट (एसएचजी) स्थापन केलेल्या रूपाली लोंडे.
एमजी मुंबईचे डीलर प्रिन्सिपल श्री. गौतम मोदी म्हणाले, “झेडएस ईव्ही भारतातील स्थिर गतीशीलतेच्या भविष्याप्रती एमजीच्या कटिबद्धतेचीप्रबळ विक्रेती आहे आणि म्हणूनच आम्ही ईव्ही ड्राइव्हसाठी अभिमानी झेडएस ईव्ही मालकांना एकत्र आणत या वेईकलला प्रशंसित करण्याचे ठरवले. ब्रॅण्डचे भागीदार म्हणून आमचा एमजीप्रमाणेच दृष्टिकोन व मिशन आहे, म्हणून आम्ही महिला इको-प्रीन्युअस्रना देखील पर्यावरण जागरूकतेप्रती त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांकरिता प्रशंसित करण्यासाठी एमजी सेवा उपक्रमांतर्गत विशेष सत्कार समारोह आयोजन करण्याकरिता युनिमोसोबत सहयोग केला. देशाच्या जडणघडणीत शाश्वतता रुजवण्याच्या दिशेने सकारात्मक वाटचाल करत पर्यावरणाचे रक्षण करण्याची आत्मीयता असलेल्या समविचारी व्यक्तींसोबत सहयोग करण्याचा आम्हाला आनंद होत आहे.”