स्थैर्य, सातारा, दि. 25 : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागला आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यात कोव्हीड टास्क फोर्स स्थापित करण्यासह अनेक उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना खा. श्री. छ. उदयनराजे यांनी जिल्हाधिकार्यांना केल्या.
जिल्ह्यातील कोरोनोची परिस्थिती बिकट बनल आहे. या पार्श्वभूमीवर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेवून उपाययोजनांबाबत चर्चा केली. या महामारीच्या निर्मुलनासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज असल्याचे सांगत त्यांनी जिल्हाधिकारी यांना काही उपाययोजना सांगून त्याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, अशा सूचना केल्या.
यावेळी सातारा जिल्हयाकरीता कोविड -19 टास्क फोर्स स्थापित करावा, एफसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांची तातडीने अंमलबजावणी करणे, शासकीय सर्वसाधारण रुग्णालयांची कार्यक्षमता जास्तीत जास्त उपयोगात आणणे, कोणतीही लक्षणे नसलेल्या कोविड रुग्णांना, घरच्या घरी उपचार घेणे कामी प्रोत्साहीत करणे, शासकीय किंवा खाजगी वैद्यकिय महाविद्यालयातील एमडी मेडीसिन असलेल्या फिजीशियन्सची चांगल्या प्रमाणात प्रतिनियुक्तीने नियुक्ती करणे, सर्वसाधारण रुग्णालय फक्त काविड -19चे रुग्णांसाठी समर्पित करणे, अन्य रोगाचे रुग्ण खाजगी दवाखान्यात उपचारार्थ पाठविणे, डब्नुयुआयडी टास्क फोर्स समितीने सुचवल्याप्रमाणे रुग्णांना डिस्चार्ज देण्याबाबत धोरण ठरवणे, सर्वसाधारण रुग्णालयांच्या कोविड सोडून इतर रुग्णांसाठी आर्यांग्ल हॉस्पिटलचा पर्याय निर्माण करुन तो पर्याय राबवा, अशा महत्त्वपूर्ण सूचना त्यांनी जिल्हाधिकार्यांना केल्या.