
दैनिक स्थैर्य । दि. १४ डिसेंबर २०२२ । सातारा । रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष,लोकनेते खासदार, मा.शरदरावजी पवार यांच्या ८२ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी कॉलेजच्या मराठी विभागाने उच्चतर शिक्षा अभियान अंतर्गत राष्ट्रीय मराठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. या स्पर्धेत छत्रपती शिवाजी कॉलेजच्या बी.ए.भाग २ मधील विद्यार्थिनी वर्षा भारत जाधव हिने लिहिलेल्या ‘बहुआयामी व्यक्तिमत्व शरदरावजी पवार ‘या निबंधास प्रथम क्रमांक मिळाला.तिला प्रथम
क्रमांकाचे पारितोषिक रुपये पाच हजार ,सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच छत्रपती शिवाजी कॉलेजच्या बी.ए.भाग -३ मधील विद्यार्थी विनय बाळासाहेब कर्चे याने लिहिलेल्या ‘बहु आयामी व्यक्तिमत्व शरदरावजी पवार ‘या निबंधास द्वितीय क्रमांक मिळाला.त्यास रुपये तीन हजार ,सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले . धनंजयराव गाडगीळ वाणिज्य कॉलेजची १२ वर्गात शिक्षण घेणारी विद्यार्थिनी अपर्णा रामचंद्र शिंदे हिने तिसरे पारितोषिक मिळविले. ‘बहुआयामी व्यक्तिमत्व : शरदरावजी पवार’ विषयावर लिहिलेल्या निबंधास रुपये दोन हजार,सन्मानचिन्ह ,प्रमाणपत्र असे पारितोषिक मिळाले. उत्तेजनार्थ ५ पारितोषिके देण्यात आली.त्यात अनुजा अनिल पोरे बी.ए भाग १ हिने लिहिलेल्या’ रयत शिक्षण संस्थेसाठी शरदरावजी पवार यांचे योगदान’ या निबंधास रुपये ५०० ,सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. तर ज्योती कृष्णात साळुंखे हिच्या ‘बहु आयामी व्यक्तिमत्व शरदरावजी पवार ‘या निबंधास रुपये पाचशे ,सन्मानचिन्ह ,व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. किसनवीर महाविद्यालय वाई येथील प्रियांका दत्तात्रय घोलप एम.ए.भाग १ हिने लिहिलेल्या ‘भारतीय तरुणाईची दिशा ‘या निबंधास उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला.तसेच कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील
एम.ए.भाग १ ची विद्यार्थिनी सारिका रमेश मुळीक व आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन ,सातारा येथील विद्यार्थी मकरंद महासिद्ध छापछडी या विद्यार्थ्यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळवले.प्रत्येकी ५०० रुपये,सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले .या स्पर्धेत विविध महाविद्यालयातील ८६ विद्यार्थी सहभागी झाले. परीक्षक म्हणून डॉ.वर्षा माने व डॉ.केशव मोरे यांनी काम पाहिले .रयत शिक्षण संस्थेचे सचिव व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर व प्रा.डॉ.प्रकाश पवार यांचे हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. त्यांनी सर्व विजेते व सहभागी यांचे अभिनंदन केले.स्पर्धेचे समन्वयक म्हणून प्रा.डॉ.संजयकुमार सरगडे, व सहसमन्वयक म्हणून प्रा.श्रीकांत भोकरे यांनी काम पाहिले. मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुभाष वाघमारे,डॉ.विद्या नावडकर ,प्रा.प्रियांका कुंभार यांनी स्पर्धा नियोजनासाठी सहकार्य केले. मराठी विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी विविध उपक्रम घेत असल्याबद्दल विविध महाविद्यालये व प्राध्यापक यांनी मराठी विभागाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.