‘आम्ही पुस्तकप्रेमी’ समूहातर्फे निबंध स्पर्धेचे आयोजन


स्थैर्य, सातारा, दि.15 ऑक्टोबर : येथील पुस्तकप्रेमी समूहातर्फे निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या निबंध स्पर्धा विविध गटात होणार आहेत. या स्पर्धेसाठी इयत्ता 5 वी ते 7 वी मधील गटासाठी मी दिवाळी कशी साजरी केली?, मला आवडलेले पुस्तक, माझा सातारा, माझा अभिमान हे विषय असून इयत्ता 8 वी ते 10 वीमधील गटासाठी मला आवडलेला मराठी साहित्यिक, अखिल भारतीय साहित्य संमेलन – एक साहित्यिक पर्वणी, माझे पहिले साहित्य संमेलन हे विषय आहेत.

महाविद्यालयीन गटासाठी मराठी साहित्य आणि जागतिकीकरणाचे आव्हान, सातारा जिल्ह्यातील समृद्ध साहित्यिक वारसा, मराठी साहित्य आणि तरुण पिढी हे विषय आहेत.

खुल्या गटासाठी शतकपूर्व अ भा मराठी साहित्य संमेलन- माझ्या अपेक्षा, मराठी भाषेचा ‘अभिजात’ दर्जा टिकवायचा कसा ? साहित्य संमेलन- नवे लेखक – संधी की आव्हान कृत्रिम बुद्धिमत्ता आणि साहित्य निर्मितीचे आव्हान हे विषय आहे. या स्पर्धेसाठी एका व्यक्तीने एकच निबंध लिहायचा आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी – 600 शब्द तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी 1000 शब्द आहे. खुला गटासाठी 1200 शब्द आहेत. निबंध हे स्वतःच्या अक्षरात असावेत. सुवाच्च्य आणि शुद्ध लेखनासाठी वेगळे बक्षीस आहे. निबंध कागदाच्या एका बाजूस लिहिलेले असावेत. एका पाकीटात घालून बंद करून द्यावेत. शालेय विद्यार्थ्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत निबंध पाठवावेत तर खुल्या गटासाठी डॉ. संदीप श्रोत्री, दत्तकाशी हॉस्पिटल, 9822058583, दीपलक्ष्मी पतसंस्था, कन्याशाळेमागे, देवी चौक, सातारा. मोबा. 7588865061, श्रीराम नानल, कांगा कॉलनी, सातारा. मोबा. 9423034050 सीमंतिनी नूलकर, मिहिका, दौलत नगर, सातारा 9822323847. यांच्याकडे 15 नोव्हेंबर 2025 पर्यंत पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!