
दैनिक स्थैर्य । दि. ३१ जानेवारी २०२३ । मुंबई । एरिनक्यू या भारतातील झपाट्याने विकसित होणाऱ्या स्टोरेज बॅटऱ्यांच्या उत्पादक व वितरक कंपनीने ऑटो इलेक्ट्रिकल क्षेत्रातील आघाडीची चेन्नई-स्थित कंपनी लूकास टीव्हीएससोबत तीन वर्षांचा सहयोग केला आहे. या सहयोगासह एरिनक्यू भारतभरात लूकासच्या मोटर्स व कंट्रोलर्सच्या वितरणाची सुविधा देण्याकरिता स्वत:च्या विक्री व विपणन सेवा विस्तारित करेल.
एरिनक्यूचा विविध उद्योग विभागांना लूकास टीव्हीएसच्या ५०,००० मोटर्स व कंट्रोलर्स वितरित करण्याचा मनसुबा आहे. यामध्ये विविध उपयोजनांसाठी १ केडब्ल्यू ते १५ केडब्ल्यू क्षमतेच्या मोटर्स, तसेच दुचाकी, हाय-स्पीड पॅसेंजर ऑटो व पिक-अप व्हॅन्सचा समावेश असेल.
या सहयोगाचा भाग म्हणून लूकास टीव्हीएस ग्राहकांना त्वरित सेवा देण्याकरिता एरिनक्यू अभियंत्यांना उत्पादनांची देखभाल व समस्यानिवारणाबाबत प्रशिक्षण देईल. यामुळे संपूर्ण भारतात मोटर्स व कंट्रोलर सर्विस सेंटर्स स्थापित करण्याची एरिनक्यूची योजना अधिक सक्षम होईल.
एरिनक्यूच्या ऑपरेशन्सचे प्रमुख व्ही. जी. अनिल म्हणाले, ‘‘हा सहयोग भारतातील ईव्ही पॉवरट्रेन उद्योगाला चालना देण्याच्या दिशेने पाऊल आहे. आमच्या प्रबळ विक्री व सेवा कौशल्यासह लूकास टीव्हीएसचा मोटर उत्पादन कौशल्यामधील ६० वर्षांहून अधिक वर्षांचा अनुभव ऑटोमेकर्सना उच्चस्तरीय पाठिंबा देईल. तसेच आम्ही या सहयोगाच्या माध्यमातून आमच्या टीमdच्या क्षमतांना चालना देण्यास देखील उत्सुक आहोत.’’