त्रिशंकू भागात साविआ कडून समत्व भावाने विकास; विलासपूर भागामध्ये उदयनराजे यांच्या हस्ते विकास कामांचा नारळ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २३ डिसेंबर २०२१ । सातारा । सातारा विकास आघाडीने त्रिशंकू भागामध्ये समत्व भावाने विकास साधण्याची भूमिका ठेवली आहे. या भूमिकेशी आम्ही सातत्याने कटिबद्ध राहणार आहोत, असे प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.

सातारा शहराच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या विलासपूर गोळीबार मैदान परिसरातील विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी खासदार उदयनराजे भोसले विविध ठिकाणी नागरीकांशी संवाद साधला. सातारा नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष मनोज शेंडे डि जी बनकर, विलासपूर परिसरातील संग्राम बर्गे,बुवा सुर्यवंशी, किरण नलवडे, यांचेसह विविध मान्यवर यावेळी प्रमुख उपस्थित होते.
खा. उदयनराजे पुढे म्हणाले लोकउपयोगी कामे आणि सेवा सुविधा नागरीकांना उपलब्ध करुन देणे हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्तव्यच आहे. याच धोरणेतुन आम्ही नेहमीच कार्यरत राहीलो आहोत. तसेच विकास ही सातत्याने घडणारी क्रिया आहे. तथापि समतोल आणि समत्वभावाने विकास साधणे महत्वाचे आहे. त्याच दृष्टी कोनामधुन सातारा विकास आघाडीची आत्तापर्यंत वाटचाल राहीली आहे.अपपरभाव ठेवून केलेल्या विकासाला विकास म्हणता येणार नाही.सातारा विकास आघाडीने कधीही हा माझा, तो माझा असा भेदभाव न ठेवता, नागरीकांना केंद्रबिंदू मानुन सेवा सुविधा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थानिक मान्यवरांच्या हस्ते, रामराव पवार नगर, स्वराज्य नगर,नंदादिप सोसायटी, शिवप्रेमी कॉलनी, जगदाळे बाग,मोरे कॉलनी,सहजीवन सोसायटी, इंदिरा नगर,फॉरेस्ट कॉलनी,यशोदा नगर,आदी ठिकाणी रस्ते डांबरीकरण,आरसीसी.ड्रेनेज व्यवस्था,नाना-नानी पार्क आदी कामांच्या भुमीपूजनचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी राहुल पाटोळे, विलास उर्फ नाना शिंदे, आबा शिंदे, काका बागल, उदय मराठे, धनेश खुडे, विजय पवार, विठ्ठल जाधव, अमोल कदम, किरण बाबर, अमेय घाडगे, जेष्ठ नागरीक संघाचे मोटे, नलवडे, वाघ, संजय चव्हाण, विक्रम पवार, राम मदाळे, गिरिष काकडे, अॅड. विकास पवार, महेश चव्हाण या कार्यकत्यांसह बहुसंख्य नागरीक उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!