
सातारा – संगणक वितरण करताना पर्यावरण गतिविधीचे कार्यकर्ते.
स्थैर्य, सातारा, दि. 27 सप्टेंबर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पर्यावरण गतिविधि व पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशन (पुणे) यांच्यावतीने ई वेस्ट संकलनादरम्यान सॉफ्टवेअर कंपन्यांकडून मिळालेल्या संगणकाचे वितरण शहरातील बापूसाहेब चिपळूणकर तसेच सह्याद्री माध्यमिक विद्यालय (शाहूनगर) या शाळांना करण्यात आले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पर्यावरण गतिविधि व पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशन (पुणे) यांच्यावतीने 26 जानेवारी 2025 रोजी शहरातील विविध भागात इ-वेस्ट संकलन उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद देत शहरातील विविध शाळा, अपार्टमेंट, सोसायटीमधीलमधील विद्यार्थी, नागरिकांनी घरातील जुन्या, बंद असलेल्या, खराब झालेल्या इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकल वस्तू स्वयंस्फूर्तीने आणून दिल्या होत्या.
पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशनचे प्रमुख राजेश मणेरीकर म्हणाले, विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी प्लॉस्टिक मुक्त परिसर, प्लॉस्टिकचा वापर कमी करावा. प्लॉस्टिक कचर्यात न टाकता ते रिसायकलिंगसाठी द्यावे. दरम्यान, विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली. दरम्यान, पर्यावरण गतिविधितर्फे शनिवार दि. 18 व रविवार दि. 19 ऑक्टोबर रोजी पुन्हा अशाच स्वरुपाच्या इ कचरा संकलन करण्यात येणार आहे. त्यावेळी घरातील इ कचरा कचर्यात न टाकता या उपक्रमात दान करावा असे आवाहन पर्यावरण गतिविधि सातारा शहर संयोजक अमोल कोडक यांनी केले.
कार्यक्रमास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर कार्यवाह रविराज गायकवाड, पर्यावरण संरक्षण गतिविधीचे जिल्हा संयोजक जयदीप ठुसे, विशाल देशपांडे, महेश सवडकर, बापूसाहेब चिपळूणकर शाळेचे मुख्याध्यापक श्री. म्हस्के, सह्याद्री माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय कुलकर्णी, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमास लक्ष्मी केशव प्रतिष्ठान व रानवाटा या संस्थांचे सहकार्य मिळाले.