प्रभाग रचनेच्या नकाशावरून प्रगणक गट गायब; निवडणूक आयोगाच्या नव्या रचनेमुळे इच्छुक उमेदवार गोंधळात

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १६ मे २०२२ । सातारा । राज्य निवडणूक आयोगाने या वेळी स्वतः सातारा जिल्ह्यातील नऊ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभागरचना अंतिम केल्या आहेत. या प्रभाग रचनेमध्ये गट पंचवार्षिक निवडणुकीत नोंदवले गेलेले प्रगणक गट यंदाच्या प्रभाग रचनेच्या नकाशातून गायब झाल्याने आपल्या वॉर्डात नक्की किती मतदान असणार याविषयी इच्छुक उमेदवारांना संभ्रमावस्था निर्माण होणार आहे. त्यामुळे या मुद्द्यावर हरकत नोंदवली जाणार असल्याची चिन्हे आहेत.

सातारा शहरांमध्ये नव्या मतदारांमध्ये चाळीस हजारांची वाढ झाली असून पहिल्या पाच प्रभागांमध्ये जोरदार चुरस रंगण्याची शक्यता आहे. सातारा नगरपालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून राजकीय हालचाली सुद्धा गतिमान झाल्या आहेत. सातारा शहराच्या नवीन प्रभाग रचनेचा नकाशा पालिकेच्या दर्शनी भागात उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र ओढे-नाले रस्ता अशा नैसर्गिक हद्दी धरून राज्य निवडणूक आयोगाने स्वतः गुगल मॅपच्या माध्यमातून प्रभाग रचना निश्चित केल्या असून त्याला शब्दश: नावे देण्यात आली आहेत. यामध्ये घरांची संख्या दर्शवणारे प्रगणक आणि त्याचे गटनंबर मात्र नकाशावरून गायब करण्यात आले आहेत. या गटाच्या माध्यमातून मतदानाची संख्या निश्चित होत होती. त्याला विशिष्ट क्रमांक देऊन एका प्रभागात सुमारे चार प्रगणक गट जर गृहीत धरले तर उपलब्ध लोकसंख्येनुसार सव्वातीन ते साडेतीन हजार मतदान आहे असे नगरसेवकाला ठाम पणे सांगता येत होते. मात्र यंदाच्या प्रभाग रचनेत प्रगणक गट गायब झाल्याने आपल्या प्रभागाचे मतदान नक्की किती यावर माहितीच उपलब्ध होणार नसल्याने भावी मेहरबानांचा गोंधळ वाढण्याची शक्यता आहे. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हरकतींचा आणि त्यावर आक्षेप नोंदवण्याचा कार्यक्रम सुरू आहे प्राप्त माहितीनुसार सातारा पालिकेच्या संदर्भात एकूण सहा हरकती प्राप्त झाल्याची माहिती आहे प्रगणक गटाचा उल्लेख प्रभाग रचनेत असावा अशी मागणी पुढे येऊ लागली आहे या संदर्भातली हरकत येत्या काही दिवसात नोंदवली जाईल अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली आहे.

हद्द वाढीमुळे सातारा शहरात 55 मतदान केंद्रांची वाढ झाली असून मतदान केंद्रांची संख्या 192 वर पोहोचली आहे 140000 मतदार यंदा मतदानाचा हक्क बजावतील असा अंदाज आहे. साधारण साडेपाच ते साडेसात हजार लोकसंख्या असणारे प्रभाग निश्चित करण्यात आली असून वार्ड क्रमांक सातची सर्वाधिक लोकसंख्या सात हजार 908 इतकी आहे. यावेळी अनुसूचित जमातीचा उमेदवार पहिल्यांदाच निवडला जाणार आहे. ओबीसी आरक्षणाच्या 6 जागा रद्द झाल्याने त्या खुल्या गटात वर्ग झाल्या आहेत. याशिवाय एससी आणि एसटी यामध्ये आठ प्रभाग आरक्षणानुसार निश्चित होतील म्हणजे खुल्या जागांसाठी एकंदर 42 प्रभाग उपलब्ध राहणार असून तेथे मोठी राजकीय स्पर्धा निर्माण होणार आहे. विषेतः प्रभाग क्रमांक तीन व 23 प्र भागाकरिता मोठी चुरस असणार आहे. गोडोली, शाहूनगर, विलासपूर या नव्या क्षेत्रातून सुद्धा दोन्ही राजे गटाचे कार्यकर्ते सक्रिय झाले असून त्यांच्या त्यांच्या पातळीवर संवाद कार्यक्रम सुरू झाला आहे.


Back to top button
Don`t copy text!