दैनिक स्थैर्य | दि. २६ डिसेंबर २०२४ | बारामती |
‘संतुष्ट व समाधानी ग्राहक’ हीच ओळख निर्माण करा आणि सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घराचे स्वप्न पूर्ण करा, असा सल्ला प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक व ‘व्ही जे डेव्हलपर’चे संचालक सर्वेश जावडेकर यांनी दिला.
बारामती तालुक्यातील पहिल्या ‘समर्थ आयकॅान प्रोजेक्ट’अंतर्गत ‘हाय-राईज् बिल्डिंग सेव्हन स्टार आयकॉन’ या इमारतीच्या जागेस भेट व बांधकाम क्षेत्रातील नवउद्योजकांना मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते.
याप्रसंगी समर्थ आयकॉनचे संचालक हरिष कुंभरकर, दादासाहेब चौधर, भारत मोकाशी, मेजर अनिल कायगुडे, गणेश मोरे, संतोष दिवेकर व उदयसिंह मोरे-पाटील व अॅड. सचिन वाघ, दिलीप भापकर, शहाजी कुंभरकर, वंजारवाडीचे सरपंच जगन्नाथ वनवे, बांधकाम व्यवसायिक रोहित घनवट, हेमंत भोंग, अवधूत लोखंडे व पुणे-बारामती येथील उद्योजक आणि इमारत उभी करण्यासाठी आवश्यक एजन्सी प्रतिनिधी उपस्थित होते.
प्रकल्प करताना होणारा खर्च, मटेरिअल खरेदी, प्रकल्प व्यवस्थापन, सरकारी धोरण, बांधकामाचा वेग व निर्माण, गुंतवणूकदार, वित्तीय कंपन्या, ग्राहक आणि रिअल इस्टेट व्यवसाय, आर्थिक बाबी, कागदपत्रे या व अशा अन्य विषयांवर बारकाईने अभ्यास करा. बारामतीचा तालुका असूनसुद्धा झपाट्याने विकास होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाचा झपाटा व दूरदृष्टी पाहता तालुक्याचे ठिकाण असतानाही बांधकाम क्षेत्राला मोठी मागणी आहे. याचे याचे श्रेय उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या विकासाला जाते, असेही जावडेकर यांनी सांगितले.
लवकरच या वास्तूचा भूमिपूजन व शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार असल्याचे सर्व संचालक यांनी यावेळी सांगितले.