उद्योजक व इतर आस्थापना विभागांनी नोंदणी करणे बंधनकारक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सिंधुदुर्गनगरी, दि. 15 : जिल्ह्यातील उद्योजक व  इतर आस्थापना विभागांनी नोंदणी करणे बंधनकारक आहे, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजगता विभागाचे सहाय्यक आयुक्त सु. शं. पवार यांनी दिली.

जिल्ह‌्यातील इच्छूक उमेदवारांना (Job Seeker) नोकरीची आवश्यकता आहे अशा उमेदवारांनी व उद्योजक, इतर आस्थापना विभागांनी  www.rojgar.mahaswayam.gov.inया संकेत स्थळावर मोफत नोंदणी करावी.  त्याचबरोबर उद्योजक, इतर आस्थापना विभागांना मनुष्यबळाची आवश्यकता असल्यास विभागाचे पोर्टलवर जागा पोस्ट (Vacancy) करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सर्व आस्थापनांना कुशल व अकुशल मनुष्यबळाचा तुटवडा निर्माण होत असेल, तर वरिल संकेतस्थळावर नोटीकिकेशन करण्यात यावे. जेणेकरुन ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करुन आवश्यक असलेल्या कुशल व अकुशल मनुष्यबळ देण्याबाबत कार्यवाही करता येईल. तसेच यापूर्वी नोंदणी केलेल्या उद्योजक व बेरोजगारांनी आपला डाटा आधार लिंक करुन घेण्यात यावा.

उमेदवारांना (Job Seeker) किंवा  उद्योजक आणि इतर आस्थापना विभागाला नोंदणी करताना, पोर्टलवर आणि जागा पोस्ट करताना काही अडचणी येत असतील, तर या कार्यालयाच्या   [email protected][email protected] ई-मेल पत्त्यावर, दूरध्वनी क्रमांक 02362-228835 किंवा या कार्यालयाचे प्रतिनिधी नामदेव सावंत मो.नं. 9403350689 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!