तांबवे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात


दैनिक स्थैर्य । 19 जून 2025 । आरडगाव । तांबवे ता. फलटण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे नवीन शैक्षणिक वर्ष 2025/ 26 चा प्रवेशोत्सव उत्साहात करण्यात आला.

याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आबासाहेब शिंदे, उपसरपंच गजानन शिंदे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष मनोज शिंदे तसेच इतर सदस्य, माता, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांचे शाळेच्या प्रवेशद्वारावरच गुलाब पुष्प देऊन टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. त्यानंतर मुलांना औक्षवण करून त्यांची ओळख करून घेण्यात आली. यावेळी पाठ्यपुस्तक वितरण, गणवेश वाटप यांसारखे कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्षात मुले पालक ग्रामस्थ सर्वच उत्साही दिसत होते.

शाळेच्या नवनिर्वाचित मुख्याध्यापिका श्रीमती चांगण यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सौ. कुलकर्णी यांनी नियोजन केले. मनेर यांनी सूत्र संचालन केले.


Back to top button
Don`t copy text!