
दैनिक स्थैर्य । 8 जुलै 2025 । सातारा । मराठवाडी धरणाच्या ओसंडणार्या सांडव्याचा नेत्रसुखद नजारा डोळ्यात साठविण्यासाठी धरण परिसरात गदी वाहू लागली आहे. पाटबंधारे विभागाने लावलेल्या प्रवेशबंदीसह विविध सूचनांच्या फलकांकडे दुर्लक्ष करून अनेक उत्साही युवक युवती आणि नागरिक धरणाच्या गेटसह भिंतीवर, तसेच परिसरातील धोकादायक ठिकाणी फोटोसेशन करत असल्याने दुर्घटनेची भीती आहे. निसर्गाच्या मराठवाडीजवळ बांगमराठवाडी धरणाच्या सांडव्यावरून ओसंडणारे पाणी पाहायला नागरिक जीव धोक्यात घालून गेटवरील गॅलरीत उतरत आहेत.
बांधलेल्या धरणाचे बांधकाम तब्बल 28 वर्षानंतर पूर्णत्वाकडे असून, सध्या धरणाच्या सांडव्यावरून वाहणारेपाणी आणि दूरवर पसरलेला जलाशय बघायला स्थानिकांसह बाहेरगावातील युवक- युवती व नागरिकांची गर्दी वाढूलागली आहे. धरणाच्या भिंतीवरूनच वाहनांची ये जा सुरू आहे. त्यावर दलदल झाल्याने वाहन थेट जलाशयात कोसळू शकते. रस्त्याच्या दोन्ही ठिकाणी प्रवेशद्वारावर पाटबंधारे विभागाने कायदेशीर कारवाईचे फलक लावले आहेत. कार्यवाही मात्र शून्य आहे. सध्या धरणाच्या भिंतीवर दिवसभर लोकांची गर्दी दिसून येते. सेल्फी तसेच विविध फोटोसेशन करताना हुल्लडबाजीही केली जाते. त्यामुळे दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे. श्री क्षेत्र नाईकबा देवस्थान येथे महाराष्ट्र-कर्नाटकातून येणार्यापैकी अनेक भाविक मराठवाडी धरण परिसरालाही भेट देत आहेत. येथे येणार्यांपैकीअनेकजण पिचिंगच्या उतारावर तसेच सांडव्यावरील गेटवर देखभाल व दुरुस्तीसाठी बसविलेल्या लोखंडी गॅलरीत उतरूनही फोटो काढत आहेत. ते पाहताना पाहणार्यांच्या अंगावर भीतीने काटा येत आहे.
मराठवाडी धरण परिसरात नागरिकांचा ओघ वाढला आहे. अनेक जण जीव धोक्यात घालून तेथील धोकादायक ठिकाणी ये-जा करत असल्याने पोलिसांनी त्या परिसरात पेट्रोलिंग वाढवले आहे. प्रवेशबंदीचे व सूचनांचे उल्लंघन करणार्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल
…डॉ. प्रवीण दाईंगडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक, ढेबेवाडी