
दैनिक स्थैर्य । दि. ०८ जुलै २०२३ । फलटण । सध्या राज्यामध्ये सुरू असलेल्या सत्ता नाट्यामुळे सर्वसामान्य नागरिक हे सत्ताधारी असलेल्या पक्षांवर नाराज आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण राज्यामध्ये एक सही संतापाची ही मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण येथे सुरू असलेल्या या मोहिमेस उस्फुर्त असा प्रतिसाद मिळत आहे.
सर्वसामान्य नागरिक जसे की शेतकरी, व्यापारी, नोकरदार व हातावरचे पोट असलेले व्यापारी असे सर्वजण एक सही संतापाची या मोहिमेमध्ये सहभागी होत आहेत व उस्फूर्तपणे सह्या करत आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यांमध्ये एक सही संतापाची ही मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. याचाच एक भाग म्हणून फलटण मधील शंकर मार्केट या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. या मोहिमेस सर्वसामान्य नागरिकांकडून उस्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे; असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.