
दैनिक स्थैर्य | दि. १० फेब्रुवारी २०२३ | फलटण |
ब्रिलियंट अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्री प्रायमरी विभागातील चिमुकल्यांच्या फूड फेस्टिवलला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमास स्कूलचे संस्थापक अध्यक्ष श्री दिलीपसिंह भोसले, अॅड. सौ. मधुबाला भोसले, सेक्रेटरी श्री. रणजीतसिंह भोसले, प्रशासकीय संचालिका सौ. प्रियदर्शनी भोसले, सद्गुरू शिक्षण संस्थेचे संचालक तेजसिंह भोसले, संचालिका मृणालिनी भोसले, सद्गुरू व महाराजा उद्योग समूहाचे सीईओ संदीप जगताप हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी मुख्याध्यापक श्री प्रफुल्ल अडागळे सर, श्री सद्गुरू शिक्षण संस्थेच्या प्रशासकीय संचालिका सौ. स्वाती फुले, सहकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. नागेश पाठक, आनंदवन प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक श्री. कैलास घाटगे व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांसमवेत पालकांनी मोठ्या उत्साहाने आपापले स्टॉल लावले होते. मोमोज, वडापाव, कचोरी, कप केक, भेळ, पाणीपुरी, अप्पे, लाडू, गुलाबजाम अशा विविध प्रकारच्या स्टॉलवर खाण्याचा आस्वाद सर्व पालकांनी घेतला.
या कार्यक्रमात प्री प्रायमरी हेड सौ. वर्षा हिरणवाळे तसेच सौ. कल्पना रणवरे, सौ. रेश्मा कणसे व इतर सर्व प्री प्रायमरीच्या शिक्षकांनी सहभाग घेतला होता.