दैनिक स्थैर्य । दि. १६ सप्टेंबर २०२१ । सातारा । आलेवाडी ता. जावली येथे आ. श्रीमंत छ. अशिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विशेष सहकार्यातून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोठ्या उत्साहात पार पडले. कॅम्पमध्ये सुमारे २०० नागरिकांनी लस घेतल्याने या कॅम्पला मोठा प्रतिसाद मिळाला.
आलेवाडी येथील श्रीकांत पवार यांनी त्यांच्या आईवडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मोफत कोविड लसीकरण कॅम्प घेण्याबाबत आ. शिवेंद्रसिंहराजे यांना विनंती केली. त्यामुळे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी विशेष सहकार्य केल्याने हा कॅम्प घेण्यात आला. यासाठी जावलीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांचेही सहकार्य लाभले. आलेवाडी ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या या कॅम्पमध्ये २०० पेक्षा जास्त ग्रामस्थांनी लसीकरणाचा लाभ घेतला.
कॅम्प यशस्वी करण्यासाठी सरपंच मंगेश पवार, सर्व सदस्य यांच्यासह श्रीकांत पवार, राजेंद्र भिलारे, तंटामुक्ती अध्यक्ष तानाजी पवार, साहेबराव पवार, अजित पवार, संजय बांदल, नैतिक पवार, सुनील पवार, यशवंत पवार आदींनी परिश्रम घेतले.