
दैनिक स्थैर्य । दि.१७ जानेवारी २०२२ । सातारा । खा.उदयनराजे कोणत्या वेळी काय करतील याचा नेम नाही. आज तर सातारच्या सेल्फी पॉईंट वर खा.उदयनराजे यांची अचानक लुंगी घालून एन्ट्री झाली. फोटो सेशन झाल्यानंतर गाडीत बसून खा.उदयनराजे यांनी सध्या सर्वत्र गाजत असणाऱ्या पुष्पा या चित्रपटातील “सामी सामी गाण्यावर ठेका धरून कॉलर उडवली.
काही दिवसांपूर्वीच खा.उदयनराजे यांनी थेटर मध्ये जाऊन हा पिक्चर आवर्जून बघितला होता. आता चक्क स्वतः उदयनराजे आणि त्यांचे 3 कार्यकर्ते हे अचानक साताऱ्यातील पोवाईनाका परिसरातील सेल्फी पॉइंटवर आले आणि त्यांनी फोटो सेशन केले. त्यानंतर गाडीत बसल्यावर सुद्धा उदयनराजे यांनी त्यांच्या हटके स्टाईल ने कॉलर उडवून आजा सामी या पुष्पा पिक्चर मधील गाण्यावर ठेका धरला.