दैनिक स्थैर्य | दि. २० ऑगस्ट २०२३ | फलटण |
कोणताही खेळ किंवा सण, उत्सव आनंद घेण्यासाठी असल्याने नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पतंग स्पर्धा यामधून आनंद घ्या, मौजमजा करा, पण कोणत्याही परिस्थितीत जीवघेण्या चायनीज मांजाचा वापर अजिबात करू नका, अशा स्पष्ट सूचना महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्पर्धक व संयोजकांना दिल्या आहेत.
नागपंचमी (पतंगपंचमी) निमित्त १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून प्रति वर्षाप्रमाणे बाणगंगा नदीकाठी श्रीमंत अनिकेतराजे मित्र मंडळ, फलटण आयोजित भव्य पतंग स्पर्धेचे उद्घाटन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते शनिमंदिर परिसरात समारंभपूर्वक झाले.
यावेळी श्रीमंत संजीवराजे यांचा यथोचित सत्कार पै. पप्पूभाई शेख यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच ज्येष्ठ पतंगपटू रशिदभाई शेख व पतंग स्पर्धा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेणारे पै. पप्पूभाई शेख यांचा यथोचित सत्कार श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, अमित भोईटे, श्रीमंत रामराजे विचार मंचचे अध्यक्ष राहुलभैय्या निंबाळकर, श्रीराम साखर कारखान्याचे संचालक महादेवराव माने, शंकरराव गुंजवटे, किशोर देशपांडे, वजीर आत्तार, बापूराव आहेरराव, निलेश खानविलकर, अमोल भोईटे, अमोल पवार, भाऊ कापसे, आदेश देशमुख, योगेश शिंदे, विशाल तेली, जमशेद पठाण, राकेश तेली, सुहास तेली, बाळासाहेब भट्टड, शाकीर महात, प्रविण भोंसले, जयवंत शिंदे, आबीद खान, महेश पवार, गोरख पवार, अरुण पवार आणि फलटण शहरातील असंख्य पतंगप्रेमी उपस्थित होते.
स्पर्धा संपताच सायंकाळी ५.३० वाजता माजी नगरसेवक नंदकुमार घारगे, नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, भाऊ कापसे, पै. पप्पूभाई शेख, पै. अभिजीत जानकर, अर्षदभाई शेख यांच्या हस्ते बक्षिस वितरण समारंभ संपन्न झाला.
या स्पर्धेमध्ये स्व. अमीर शेख व स्व. गणेश लोंढे यांच्या स्मरणार्थ विजेत्या स्पर्धकांना चषक प्रदान करण्यात आले. नितीन निंबाळकर यांनी ५ हजार रुपये रोख व चषक हे प्रथम क्रमांकाचे, अवधूत पवार यांनी ४ हजार रुपये रोख व चषक हे द्वितीय क्रमांकाचे, एस. के. ग्रुप यांनी २ हजार रुपये रोख व चषक हे तृतीय क्रमांकाचे, लखन घाडगे यांनी १ हजार रुपये रोख व चषक हे चतुर्थ क्रमांकाचे आणि उतेजनार्थ चषक शुभम बाबर यांनी पटकविला.
या स्पर्धेमध्ये ३२ स्पर्धक सहभागी झाले होते. पतंग स्पर्धा यशस्वी होण्यासाठी श्रीमंत अनिकेतराजे मित्र मंडळ, पै. पप्पूभाई शेख मित्र मंडळ, पै. पप्पूभाई शेख, फिरोज शेख, अभिजीत जानकर, अविनाश पवार, वसीम शेख, अरुण आंबोले, सनी पवार, नरेश पालकर, जफर आत्तार, संजय कापसे, अजिंक्य राऊत, दिलीप चवंडके, दत्ता जाधव, हैदर शेख, आफताब मणेर, अबू डांगे, जाहिद डांगे, गणेश जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.