दैनिक स्थैर्य । दि. १३ जून २०२२ । पाटण । बांबवडे तालुका पाटण येथील गायमुख वाडी मार्गावर खडखडी येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दोन अभियंत्यांना लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आल्याची घटना 10 जून रोजी दुपारी दीड वाजता घडली आहे या प्रकरणी विजय शहाजी पवार व 51 यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत पाणीपुरवठा पाइपलाइनच्या चालू कामाची श्री एस आर वसगडे उपअभियंता सातारा व पाटण येथील शाखा अभियंता एस डी कदम हे पाणी करत होते या कामाबाबत ची माहिती घेत असताना जगदीश तुकाराम जाधव ,अमोल तुकाराम जाधव, राकेश सुरेश जाधव, संभाजी परशुराम जाधव, विजय शंकर जाधव, गणेश शंकर जाधव, मधुकर हणमंत देशमुख सर्वजण राहणार बांबवडे यांनी तुम्ही या योजनेत पैसे खाल्ले आहेत हे काम तात्काळ बंद करा असे म्हणत त्यांना दमबाजी करायला सुरुवात केली . फिर्यादी यांनी हे काम शासकीय आहे याबाबत तुम्ही अडथळा आणू नका जे करायचे आहे ते कायदेशीर मार्गाने करा असे त्यांना सुनावले.
त्यावेळी संबंधित जगदीश जाधव अमोल जाधव संभाजी जाधव व विजय जाधव यांनी त्याठिकाणी असलेल्या लाकडी दांडक्याने फिर्यादीला खांद्यावर दांडक्याने मारले तसेच तेथील दगडाने सुद्धा मारहाण केली शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील करत आहेत.