
दैनिक स्थैर्य । 7 जुलै 2025 । बारामती । अभियंता म्हणजे वैज्ञानिक आणि तांत्रिक ज्ञानाचा वापर करून मानवी जीवनातील समस्या सोडवणारा, नवनवीन तंत्रज्ञान, यंत्रणा, पायाभूत सुविधा आणि उद्योग विकसित करणारा व्यक्ती. अभियंते विविध क्षेत्रात कार्यरत असतात – सिव्हिल, यांत्रिक, इलेक्ट्रिकल, संगणक, केमिकल, आदी म्हणून भारताच्या प्रगतीत अभियंत्यांची भूमिका म्हतपूर्ण आसल्याचे प्रतिपादन डॉ. दिनेश शालन भगवान हंचाटे, यांनी केले.
बारामती दौंड येथील विविध क्षेत्रातील अभियंता यांचा सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते याप्रसंगी बारामती व दौंड तालुक्यातील विविध क्षेत्रातील अनेक अभियंते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभियंते हे देशाच्या प्रगतीचे कणा आहेत. त्यांनी पायाभूत सुविधा, उद्योग, तंत्रज्ञान, ऊर्जा, वाहतूक, जलसंपदा, माहिती तंत्रज्ञान, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
भारतातील प्राचीन अभियंते – सिंधू संस्कृतीतील शहरांचे नियोजन, दक्षिण भारतातील मंदिरे, गुजरातचे विहिरी, राजस्थानमधील किल्ले – हे सर्व त्या काळातील अभियंत्यांच्या कौशल्याचे उदाहरण आहेत. आधुनिक भारताच्या विकासात अभियंत्यांनी मोठी भूमिका बजावली. रस्ते, पूल, धरणे, वीज प्रकल्प, मेट्रो, विमानतळ, औद्योगिक वसाहती, माहिती तंत्रज्ञान पार्क्स, स्मार्ट सिटी, हे सर्व अभियंत्यांच्या कल्पकतेमुळे शक्य झाले आहे.
सर एम. विश्वेश्वरय्या हे भारतातील सर्वात महान अभियंत्यांपैकी एक मानले जातात. त्यांनी कृष्णराज सागर धरण, सिंचन व पूरनियंत्रण प्रकल्प, मुंबईच्या बंदरातील ड्रेनेज सिस्टम, अशा अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांची रचना केली. भारतातील महिला अभियंत्यांनीही समाजातील अडथळ्यांवर मात करून अभियांत्रिकी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. प्रा. मनोज शिंदे यांनी आभार मानले.