दैनिक स्थैर्य । दि. १७ ऑक्टोबर २०२२ । सातारा । सातारा येथील जलसंपदा विभागातून अभियंता म्हणून सेवानिवृत्त झालेले व राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाने आदर्श अभियंता म्हणून गौरवलेले डी.बी. उर्फ धन्यकुमार कदम (६६) यांचे अल्पशा आजाराने सातारा येथे नुकतेच निधन झाले. त्यांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांचे देहदान व नेत्रदान करण्यात आलेले आहे. त्यांच्या मागे पत्नी , दोन विवाहित मुली , जावई , नातवंडे , व बंधू किरण व वहिनी सौ. सुनंदा असा परिवार आहे. – कोयना धरणामध्ये लेक टॅपिंग करण्यापूर्वीचा जो सर्वेक्षण करण्यात आले होते ते सर्वेक्षण अभियंता धन्यकुमार कदम यांनी केला होते हे विशेष. अतिशय सच्चा व प्रामाणिक अभियंता म्हणून ते जलसंपदा विभागात परिचित होते. गतवर्षीच त्यांचे ” *असा घडलो , असा जगलो* ” हे आत्मनिवेदन पर पुस्तक प्रसिद्ध झाले होते. या पुस्तकाच्या विक्रीमधून जी रक्कम जमा झाली ती सर्व त्यांनी वेळे येथील यशोधन निवारा आश्रमास तसेच शेंद्रे येथील एहसास मतिमंद विद्यालयास देणगी म्हणून दिली होती. त्यांच्या निधनानंतर कोणतेही धार्मिक विधी करण्यात येणार नाहीत असे त्यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आले.