स्थैर्य, सातारा, दि. 10 : वाढेफाटा, ता. सातारा येथून दहा हजारांचे जी.टी. शक्ती कंपनीचे 3 एचपीचे इंजिन अज्ञात चोरट्याने चोरून नेले. याप्रकरणी दत्तात्रय शंकर नलावडे यांनी सातारा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पो. ना. शिखरे तपास करत आहेत.
कारची दुचाकीला धडक, लहान मुलासह तीन जखमी
स्थैर्य, सातारा, दि. 10 : क्षेत्रमाहुली, ता. सातारा येथे भरधाव डस्टर कारची दुचाकीला धडक बसून चार वर्षाच्या मुलासह तीनजण जखमी झाले.
याबाबात माहिती अशी, कारचालक महेश सुखदेव जाधव रा. वरकुटे-मलवडी, ता. माण हे क्षेत्रमाहुलीजवळ रस्त्याचे काम सुरू असूनही भरधाव वेगाने निघाले होते. त्यांच्या गाडीची एका मोटारसायकलला जोराची धडक बसली. या अपघातात मोटर सायकलवरील विठ्ठल दगडू भागवत वय 55, सविता विठ्ठल भागवत 34 आणि चिन्मय विठ्ठल भागवत वय 4 हे तिघे जखमी झाले. तसेच अपघातात कार आणि मोटारसायकलचेही मोठे नुकसान झाले. या अपघातप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात चालक महेश जाधव याच्याविरोधात तक्रार दाखल झाली असून हवालदार भोसले तपास करत आहेत.