ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना कोरोनाची लागण


 

स्थैर्य, मुंबई, दि.१८: मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. अशातच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. डॉ. नितीन राऊत यांनी स्वत: ट्वीटरवरून यासंदर्भातील माहिती दिली. तसंच आपल्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करून घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.

“मला कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोनाची चाचणी करून घेण्याचं आवाहन करत आहे. सर्वांनी सुरक्षित राहा आणि आपली काळजी घ्या,” असं राऊत म्हणाले. त्यांनी ट्वीटरवरून यासंदर्भातील माहिती दिली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!