सातारा पालिकेने हटवले अतीक्रमण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २७ एप्रिल २०२२ । सातारा । सातारा पालिकेने आज राजपथ तसेच शाही मस्‍जिद परिसरातील अतीक्रमणे हटवली. या कारवाईसाठी पालिकेने सातारा पोलिसांची मदत घेतली होती.

गेल्‍या काही दिवसांपासून सातारा शहर आणि परिसरातील अतीक्रमणांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. याबाबत ओरड होवूनही त्‍याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होते. फुटपाथवर टाकलेल्‍या टपऱ्यांमुळे नागरीकांची चालताना मोठी गैरसोय होत होती. यामुळे सातारा पालिकेने आज राजपथ तसेच जुना दवाखाना परिसरात अतीक्रमण मोहिम राबवली. या मोहिमेदरम्‍यान फुटपाथवर टाकण्‍यात आलेल्‍या चहाच्‍या टपऱ्या, पानपट्टी तसेच इतर अतीक्रमणे हटविण्‍यात आली. हटविलेली अतीक्रमणे पालिकेने जप्‍त केली आहेत. या कारवाईदरम्‍यान कोणताही अडथळा येवू नये, यासाठी पालिकेने सातारा शहर पोलिसांची मदत घेतली होती. अशाच पध्‍दतीने शहराच्‍या विविध भागात तसेच मध्‍यवर्ती बसस्‍थानकाकडे जाणाऱ्या मुख्‍य रस्‍त्‍यांवरील अतीक्रमणे हटविण्‍याची मागणी नागरीकांकडुन होत आहे.


Back to top button
Don`t copy text!