स्थैर्य, सातारा, दि. ११ : कोरोनामुळे मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरात कामधंद्यासाठी स्थायिक झालेले सातारा जिल्ह्यातील अनेक लोक परत सुरक्षितेसाठी आपआपल्या गावाकडे परतू लागले आहेत.
इतर राज्यातीलही लोक आपल्या कुटुंबासहित मिळेल त्या मार्गाने घरच्यांच्या आणि स्वतःच्या जीवाची काळजीपोटी स्थलांतर करत आहेत. गेली तीन महिने हे श्रमिक व कष्टकरी लोकांना अत्यंत हलाखीत गेले आहेत. आता त्यावर शोक करण्यापेक्षा काम करून आणि दुसरा पर्याय शोधण्याशिवाय गत्यंतर राहिले नाही.
अशा लोकांना काम मिळण्यासाठी सातारा औद्योगिक क्षेत्रात काम करण्यासाठी उद्योजक आणि जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी पुढाकार घेऊन औद्योगिक क्षेत्रात रोजगाराची संधी निर्माण केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून यासाठी एक जिल्ह्यातील नवीन रोजगाराची माहिती असलेली लिंक विशेषतः जे मुंबई -पुण्याहून स्वगृही परतले आहेत. त्यांच्या मोबाईल क्रमांकावर एका संदेशाद्वारे पाठवण्यात येत आहे. या मध्ये जिल्हातील तालुक्यामध्ये असलेल्या रोजगाराची माहिती, कामाचे स्वरूप, शिल्लक जागा याची माहिती मिळू शकेल. या उपक्रमात उद्योजकांचा पुढाकार ही महत्वाचा आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंग स्वतः यामध्ये लक्ष घालून आहेत त्यासाठी त्यांनी ” महास्वयंम ” पोर्टलवर नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.