
दैनिक स्थैर्य । दि. ०४ नोव्हेंबर २०२२ । सातारा । जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा यांच्यावतीने दि.10 नोव्हेंबर रोजी पंडीत दिनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यात पदवीधर, आयटीआय सर्व ट्रेड, डिप्लोमा, इंजिनीअर अशी 135 अधीक पदे https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अधिसूचित केली आहेत. इच्छुक उमेदवारांनी या संकेतस्थळावर नोंदणी करुन शैक्षणिक पात्रतेनुसार रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज करावेत. मेळाव्यात सहभागी उमेदवारांच्या ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत.
अधिक माहितीसाठी 02162-239938 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. जिल्ह्यातील जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी केले आहे.