दैनिक स्थैर्य । दि. ०१ डिसेंबर २०२१ । फलटण । गेले २५ दिवस राज्यामध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचारी हे महामंडळ कर्मचाऱ्यांचे राज्य शाशनामध्ये विलीगीकरण करण्यासाठी संपावर आहेत. तरी फलटण आगारातील कर्मचारी हे संपावर ठाम असून राज्य शाशनामध्ये समाविष्ट झाल्याशिवाय संपवरून मागे हटणार नाही, असा पवित्रा सुद्धा फलटण आगारातील कर्मचाऱ्यांचा आहे.
संप सुरु झाल्यापासून संपकाळामध्ये फक्त एक एस.टी.बस फलटण ते सातारा मार्गावर धावली होती. ती सुद्धा विना वाहक व विना प्रवासी धावलेली होती. संपामध्ये कार्यालयीन आठ कर्मचारी तर कार्यशाळेतील पंधरा कर्मचारी हे कामावर परतले असुन बाकी सर्व कर्मचारी संपावर ठाम आहेत. सुमारे १५ डेलीवेजेस कर्मचारी यानां सेवा समाप्तीची नोटीस देण्यात आली आहे. शासनाने केलेली पगारवाढ हि अत्यंत तोकडी असल्याने कर्मचारी नाराज असल्याचे बोलले जात आहे.