स्थैर्य, फलटण, दि. २६ : शेती व्यवसासातून आर्थिक उत्पन्नाचा स्तर उंचावण्यासाठी शेतकर्यांना सेंद्रिय आणि निर्यातक्षम दर्जेदार शेतीमालाचे उत्पादन घ्यावे, असा सल्ला फलटण येथील के.बी. बायो ऑरगॅनिक्स कंपनीचे संचालक सचिन यादव यांनी दिला.
सेंद्रिय शेती आणि उत्पादनाबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी के.बी. बायोऑरगॅनिक्स कंपनीतर्फे शेतकर्यांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, यावेळी सचिन यादव यांनी मार्गदर्शन केले.
के.बी.एक्सपोर्टस समूहाचा भाग असलेली के.बी.बायो ऑरगॅनिक्स प्रा. लि. कंपनी सेंद्रिय तसेच वनस्पतिजन्य कीडनाशकांची निर्मिती करते, ही उत्पादने आंतरराष्ट्रीय मानक पूर्ण करतात. कंपनीची सर्व उत्पादने इकोसर्ट प्रमाणित, पेटंट सुरक्षित तसेच नीमवर आधारित आहेत. द्राक्ष आणि इतर पिकांवरील डाऊनी मिल्डयू रोगाच्या नियंत्रणासाठी कंपनीचे डाऊनी रेझ उत्पादन उपयुक्त असल्याचा दावा यादव यांनी या वेळी केला.
कंपनीचे संचालक कौशल खखर आणि सचिन यादव यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने संशोधन आणि विस्तार कार्यात प्रगती केली आहे.
कंपनीच्या सेंद्रिय उत्पादनांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी आहे, असे ही सचिन यादव यांनी सांगितले .