बाजार समितीच्या फिरता दवाखान्यास मलठणमध्ये उस्फुर्त प्रतिसाद

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. २३ : विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिपकराव चव्हाण, महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनचे अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समिती, फलटण यांच्या वतीने रविवार, दिनांक २१ जून २०२० रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या सुचनेनुसार माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक पांडुरंग मानसिंगराव गुंजवटे, दिपक कुंभार यांच्या पुढाकाराने प्रभाग क्रमांक ५ मधील मलठण येथील स्वामी समर्थ मंदिर परिसर (गोसावी वस्ती), गंगानगर (गोसावी वस्ती), दफनभूमी परिसर (कुंभार भट्टी) इत्यादी ठिकाणी लॉकडाऊनच्या काळात कृषी उत्पन्न बाजार समितीचा “फिरता दवाखाना आपल्या दारी” हा उपक्रम राबविण्यात आला.

सर्वप्रथम आरोग्य तपासणीसाठी आलेल्या नागरिकांचे टेम्परेचर स्कॅनरद्वारे स्क्रिनींग करण्यात आले. मास्क परिधान केले असलेची खात्री करुन हँडसॅनिटायझर देऊन अत्यंत शिस्तबद्ध आणि सोशल डिस्टनसिंग पाळून आरोग्य तपासणी व मोफत ओषधोपचार उपक्रम राबविण्यात आला. यावेळेस उपस्थित सर्व नागरिकांची नाव नोंदणी करणेत आली. या ठिकाणी मा.डॉ.धनश्री शिराळकर आणि बाजार समिती स्टाफ यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

सदरील उपक्रम राबविताना समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर, प्रितसिंह अमरसिंह खानविलकर, आकाश सोनवलकर, मार्केट कमिटी अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. प्रभागातील नागरिकांना कोरोना कोविड १९ बाबत माहिती देण्यात आली, लोकांना आरोग्य विषयक सोयी सुविधा कृषी उत्पन्न बाजार समिती, फलटण यांच्या वतीने नागरिकांच्या दारापर्यंत पोहचविण्यात आली, या सुविधेचा सुमारे ४३६ च्या वर नागरिक बंधू भगिनी यांनी लाभ घेतला.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!