कोरोनामुळे आणीबाणीची परिस्थिती; जर्मनीतही २ नोव्हेंबरपासून पुन्हा लॉकडाऊन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, मुंबई, दि.३१: दुस-या लाटेत जर्मनीतील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली असून तो दर कमी झाला नाही तर आरोग्य व्यवस्था कोलमडून पडेल अशी भीती खुद्द देशाच्या पंतप्रधान अँजले मार्केल यांनी व्यक्त केली आहे. ही आणीबाणी टाळण्यासाठी देशात २ नोव्हेंबरपासून पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याची घोषणा झाली आहे. रुग्णसंख्येनुसार शहरांचे हिरवा, पिवळा आणि लाल असे झोन तयार केले जात असून त्यानुसार निर्बंध लादले जात असल्याची माहिती जर्मनीत स्थायिक असलेल्या अमित गोरे यांनी दिली.

मे महिन्यांत एका दिवशी आढळलेले ६ हजार रुग्ण आणि ३५० मृत्यू हा जर्मनीचा उच्चांक होता. मात्र, आता रुग्णसंख्या उसळी घेत असून दोन दिवसांपूर्वी तो आकडा १४ हजारांवर गेला होता. युरोपातील कोरोनाच्या पहिल्या कोरोना लाटेत इटली आणि ब्रिटनमधिल मृत्यू दर अनुक्रमे ९ आणि ४.२ टक्के असताना जर्मनीने कठोर उपाय योजनांमुळे तो दर ०.३ टक्क्यांवरच रोखून ठेवला होता. दुस-या लाटेतही मृत्यूचे प्रमाण आणखी घटले असून ती दिलासादायक बाब आहे. मात्र, गेल्या १० दिवसांत आयसीयूमध्ये उपचार घेणा-या रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. सध्या ३३ टक्के बेड रिक्त असले तरी वाढत्या संक्रमणाचा वेग पाहता ते सुध्दा अपूरे पडण्याची भीती सरकारने व्यक्त केली आहे. ७५ टक्के रुग्णांच्या संसर्गाचे मूळ शोधणे सरकारला अशक्य झाले आहे. आँगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांतील सहली या वाढत्या संक्रमणास कारणीभूत असल्याचीही चर्चा देशात हे. डिसेंबर महिन्यांतील ख्रिसमस सेलीब्रेशन करायचे असेल तर पुढील एक दीड महिना निबंर्धांसह दैनंदिन जीवन जगण्याशिवाय पर्याय नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

बार, रेस्ट्राँरण्ट, स्विमिंग पूल, मनोरंजनाची ठिकाणे, अनावश्यक प्रवास, स्पोर्टस इव्हेंट, सार्वजनिक कार्यक्रम, पर्यटकांचा हॉटेलांमधील मुक्काम या सर्वांवर बंदी घालण्यात आली आहे. प्रार्थनास्थळे, शाळा आणि छोट्या मुलांसाठी बगीचे सुरू ठेवले जातील. शक्य असेल तर घरूनच काम करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!