स्थैर्य, सातारा, दि. १९: शासकीय रेशनिंगच्या दुकानासाठीच्या 500 किलो धान्याचा अपहार केल्याप्रकरणी चौघांवर मेढा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
दिलीप दिनकर महामूलकर रा. करंदोशी ता. जावली, विपूल महादेव केंजळे रा. केंजळ ता. जावली, नितीन सूर्यकांत गोळे रा. चिंचणी ता. जावली, प्रसाद सूर्यकांत गोळे रा. मोहाट ता. जावली अशी संशयितांची नावे आहेत. हे चौघे दि. 17 जून रोजी दुपारी 1.20 च्या सुमारास कुडाळ ते पाचवड जाणारे रोडवर महिंद्र जीपमधून जात होते. या जीपमध्ये रेशनिंग दूकानातील पांडर्या पोत्यात असलेला 200 किलो गहू आणि 300 किलो तांदूळ अशा मालाचा अपहार करून चोरटी विक्री करत असताना घेवून जात असताना तोंडाला विनामास्क मिळून आले. याप्रकरणी तहसिल कार्यालयाचे पूरवठा निरीक्षक हेमंत लक्ष्मण धुमाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चौघांवर सीआरपीसी नुसार नोटीस बजावण्यात आली असून हवालदार ओवाळ तपास करत आहेत.