फलटणमधील गारमेंट किंग प्लसमध्ये सुमारे दोन कोटींचा अपहार; फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०७ ऑक्टोबर २०२१ । फलटण । फलटण येथील गारमेंट किंग प्लस या दुकानामध्ये सुनील मछिंद्र दोरगे, रा. यवत, ता. पुरंदर, प्रसाद प्रकाश पंडित, रा. वडूज, ता. खटाव, नितीन फडतरे, रा. पुसेगाव, ता. फलटण, सुरेश आचमे, रा. गंगाखेड, जि. परभणी यांनी सुमित हणुमंतराव जगदाळे, मूळ रा. बिदाल, ता. माण, सध्या रा. कोळकी, ता. फलटण व त्यांचे व्यावसायिक भागीदार धोंडीराम घाडगे यांच्या मालकीच्या गारमेंट किंग प्लस या दुकानाच्या फलटण शाखेमधून मालकांचा विश्वास संपादन करून एकूण एक कोटी ९७ लाख ५० हजार २५५ रुपयांचा अपहार केला व काही माल पुसेगाव, ता. खटाव येथे तर काही माल गंगाखेड, जि. परभणी येथील दुकानांमधून विक्री केला म्हणून याबाबतचा गुन्हा फलटण शहर पोलीस स्टेशमध्ये नोंदवण्यात आलेला आहे.

याबाबत फलटण शहर पोलीस स्टेशनकडून मिळालेली माहिती अशी कि, सुनील मछिंद्र दोरगे, रा. यवत, ता. पुरंदर, प्रसाद प्रकाश पंडित, रा. वडूज, ता. खटाव, नितीन फडतरे, रा. पुसेगाव, ता. फलटण, सुरेश आचमे, रा. गंगाखेड, जि. परभणी यांनी संगनमताने सुमित हणुमंतराव जगदाळे, मूळ रा. बिदाल, ता. माण, सध्या रा. कोळकी, ता. फलटण व त्यांचे व्यावसायिक भागीदार धोंडीराम घाडगे यांच्या मालकीच्या गारमेंट किंग प्लस या दुकानाच्या फलटण शाखेमधून विविध ब्रँड्सच्या खरेदी म्हणजेच दुकानात आवक केलेले एक लाख ५० हजार वस्तूंच्या बारकोड पैकी दुकानाच्या बारकोड सिस्टीम मधून ४५५३० वस्तूंचे बारकोड म्हणजेच एक कोटी ९० लाख ९४ हजार ८०९ रुपयांचे बारकोड असलेल्या वस्तू डिलीट केले व ग्राहकांकडून येणारे सहा लाख ५५ हजार ४४६ रुपये दुकानाच्या अकाउंटला जमा केलेले नाहीत. असे करत एकूण एक कोटी ९७ लाख ५० हजार २५५ रुपयांचा अपहार केलेला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊळ करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!