ईलिसियम ऑटोमोटीव्हद्वारे नवीन ईव्ही दुचाकी ब्रँड ‘ईव्हीयम’ ची घोषणा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २६ जून २०२२ । मुंबई । ईलिसियम ऑटोमोटीव्हज, ह्या युनायटेड अरब एमिरेटसमधील ग्रूप कंपनी मेटा४ ग्रूप च्या ऑटोमोबाईल शाखेने ईव्हीयम ह्या भारतातील आपल्या दोन ईव्ही दुचाकींच्या शुभारंभाची घोषणा केली आहे.

आपल्या वाटचालीच्या सुरुवात करण्यासाठी ईव्हीयमद्वारे एका महिन्यामध्ये ३ इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या शुभारंभाचे नियोजन केले आहे. ईव्हीयम हा पूर्णपणे भारतात बनवण्यात आलेला ब्रँड असेल व ईव्हीयमच्या सर्व स्कूटर्सचे उत्पादन मेटा४ ग्रूपच्या व्हॉल्टली एनर्जी उत्पादन प्लांटमध्ये केली गेली आहे. व्होल्टली एनर्जीने अलीकडेच जाहिराबाद येथे १५- एकर जमीन प्राप्त करून तिथे फक्त इलेक्ट्रिक वाहनांसाठी असलेल्या उत्पादन संकुलाच्या निर्मितीसाठी तेलंगणा सरकारसोबत एका एमओयुवर स्वाक्षरी केली आहे. हे संकुल उभे करण्यासाठी ब्रँडने रू. २५० कोटींपेक्षा अधिक गुंतवणुकीची योजना केली आहे व ह्या आर्थिक वर्षाच्या शेवटी हे संकुल कार्य सुरू करेल.

ईव्हीयम युजर्सना ईव्ही सुविधांमधील सर्वोत्तम अनुभव देईल ज्यामध्ये इलेक्ट्रिक स्कूटर्स, सायकल, इलेक्ट्रिक बाईक इ. चा समवेश असेल. अलीकडच्या काळामध्ये ह्या क्षेत्रामध्ये अनेक घटकांचा प्रवेश झाला असल्याचे चित्र लक्षात घेतले तरी लोकलायजेशनचा स्तर अद्याप कमी आहे. भारतीय सरकारच्या ‘पंचामृत’ व्हिजनसह ई- मोबिलिटी व्हिजन पुढे नेण्यासाठी इलीसियम ऑटोमोटीव्हजने १००% भारतीय इलेक्ट्रिक वाहनांच्या व्हेंचरचा शुभारंभ केला आहे. ईव्हीयम त्यांचे स्वत:चे टेलेमॅटीक्स एप उपलब्ध करेल ज्यामध्ये डिजिलॉकर, सर्वांत जवळच्या चार्जिंग स्टेशनचे स्थान, जिओ- फेन्सिंग इ. सुविधा असतील.

मेटा४ चे ग्रूप सीईओ श्री. मुज्जमिल रियाज़ यांनी सांगितले की, “भारतीय ग्राहकांसाठी भारतीय नियामक यंत्रणेने निर्धारित केलेल्या फेम2 मान्यतांनुसार वाजवी दरामध्ये गुणवत्तापूर्ण ईव्हीज उपलब्ध करून देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. मार्केटमधील इलेक्ट्रिक वाहनांचे अनेक ब्रँडस अशी उत्पादने सुरू करत आहेत ज्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांविषयी फक्त नकारात्मक प्रतिमाच तयार होते आहे. व्यावसायिक व कुशल टीमसह सुरक्षित व आत्मविश्वास असलेली ईव्ही कशी असते, ह्याबद्दल भारतीय मने बदलण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.”

जागतिक पातळीवर वाढलेले इंधन दर आणि वाढलेल्या पर्यावरणीय संरक्षण जागरूकतेच्या संदर्भात आपल्या स्वत:च्या ई- मोबिलिटी ब्रँड ईव्हीयमचा भारतातील शुभारंभ ही स्वप्नवत वाटचाल आहे. देशातील मूल्य स्थान व मोबिलिटी स्पर्धा लक्षात घेऊन आम्ही ३ इलेक्ट्रिक स्कूटर्सची सुरुवात करत आहोत. तसेच, आम्ही पूर्णपणे भारतात बनवलेले उत्पादन आणण्यासाठी कटिबद्ध आहोत ज्यामुळे ब्रँड भारतीय ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार गुणवत्ता व तंत्रज्ञानाचे नियंत्रण करू शकेल,” असे ईव्हीयमचे विक्री विपणन उपाध्यक्ष श्री. आदित्य रेड्डी यांनी म्हंटले.

ईव्हीयमने आधीच वितरकांना सहभागी करणे सुरू केले आहे आणि आपल्या सुरुवातीच्या विस्तार योजनेचा भाग म्हणून आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या शेवटी महाराष्ट्र, गुजरात, तमिळ नाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरला, कर्नाटक, दिल्ली- एनसीआर, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओदिशा व पश्चिम बंगाल येथे आपली उपस्थिती निर्माण करण्यासाठी ते कटिबद्ध आहे.


Back to top button
Don`t copy text!