
दैनिक स्थैर्य | दि. 12 एप्रिल 2025 | फलटण | सर्वांना हक्काची घरे मिळण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली आहे. यामध्ये ग्रामीण भागामध्ये सुद्धा सर्वसामान्य नागरिकांना हक्काचे घर मिळण्यासाठी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांनी राज्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) ची मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणी करत आहेत. सदरील योजनेसाठी कोळकी गावामध्ये सर्वेक्षण सुरू असून ज्यांना हक्काचे घर हवे आहे, अशा सर्व पात्र लाभार्थ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज करावा, असे आवाहन युवा नेते उदयसिंह (बबलु) निंबाळकर यांनी केले आहे.
सर्वसामान्य नागरिकांना हक्काचे घर मिळण्यासाठी सातारा जिल्ह्यामध्ये मोठे उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) च्या माध्यमातून ज्यांना पूर्वीचे घर नाही, अशा सर्वांनी विहित नमुन्यात अर्ज करण्याचे आवाहन यावेळी निंबाळकर यांनी केले आहे.
ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील, स्वराज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून फलटण तालुक्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) ची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. तरी कोळकी गावातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे सुद्धा निंबाळकर यांनी स्पष्ट केले आहे.