ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी ओबीसी जनमोर्चाचा आंदोलनाचा एल्गार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि.२२: स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण कायम ठेवा, ओबीसी जातवार जनगणना झालीच पाहिजे, पदोन्नतीमध्ये ओबीसींना आरक्षण मिळालेच पाहिजे, ओबीसी आरक्षणमधील सधन व उच्चवर्गीय लोकांची घुसखोरी थांबलीच पाहिजे या प्रमुख मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ओबीसी जनमोर्चाच्यावतीने गुरुवार दिनांक 24 जून रोजी राज्यातील सर्व तहसील कार्यालयांसमोर ओबीसी जनमोर्चाच्या वतीने निदर्शने करण्यात येणार असल्याचे पत्रक ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष तथा माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

महाविकास आघाडीचे सरकार जाणूनबुजून ओबीसी समाजाच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष करीत आहे. ओबीसी समाजाच्या मागण्या भविष्यात मान्य न झाल्यास यापेक्षा ही तीव्र आंदोलन राज्यभरात करण्यात येणार असल्याचेही प्रकाश शेंडगे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.


Back to top button
Don`t copy text!