मराठा बांधवांचा एल्गार:आज सोलापूर बंदची हाक; आरक्षणासाठी राज्यातील पहिल्या आंदोलनाची ठिणगी माढ्यात, टायर पेटवून मराठा समाजाच्या तरुणांनी केला सरकारचा निषेध


 

स्थैर्य, सोलापूर/माढा, दि.२१: मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थिगिती मिळाल्यानंतर मराठा समाज प्रचंड नाराज आहे. दरम्यान आता मराठा बांधवांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. रविवारी मुंबईत मराठा समाजाकडून आंदोलने करण्यात आली होती. यानंतर आता मराठा बांधवांनी आरक्षणासाठी राज्यातील पहिला जिल्हा बंद केला आहे. मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेत राज्यभर आंदोलन करण्यास सुरूवात केली आहे. आज सोलापुरात मराठा समाजाचं आंदोलन केलं जात आहे. जिल्ह्यातली आंदोलनाची पहिली ठिणगी माढ्यात पडली आहे.

मराठा आरक्षण प्रश्नी जिल्ह्यातल्या पहिल्या आंदोलनाची ठिणगी माढ्यात पडली. माढा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सोमवारी पहाटे 5.30 वाजताच टायर पेटवून केंद्र व राज्य सरकारचा मराठा समाजाच्या तरुणांनी निषेध केला. एक लाख मराठा, लाख मराठा लाखचा जयघोष यावेळी करण्यात आला. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून माढ्यात रस्त्यावर टायर जाळून जिल्हा बंदला सुरुवात झाली. या आंदोलनात अन्य समाजाचे बांधव देखिल सहभागी झाले होते. या बंदला विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे जिल्ह्याभरात कडकडीत बंद पाळला जाण्याची शक्यता आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!