
दैनिक स्थैर्य । दि. ०९ डिसेंबर २०२२ । गोंदवले । म्हसवड, ता. माण येथील मेरिमाता हायस्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेजचे प्रिन्सिपॉल जॉमी थॉमस (वय 40) व सिन न्यॅथ्यु (वय 39, रा. आशा भवन, रहिमतपूर रोड कोडोली) यांच्याविरोधात म्हसवड पोलीस ठाण्यात वुज चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी उज्ज्वला मोहन लोखंडे यांनी फिर्याद दिली. दि. 28 एप्रिल 2021 ते 28 एप्रिल 2022 च्या दरम्यान ही वीजचोरी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.