दैनिक स्थैर्य । दि.०९ मार्च २०२२ । सातारा । राहत्या घरातील लाईटचा मीटर बदलण्यासाठी एक हजार रुपयांची लाच मागणाऱ्या विद्युत वितरण कंपनीच्या फलटण येथील प्रधान तंत्र कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले कार्तिकस्वामी तुळशीराम गुरव वय 45 राहणार लक्ष्मी नगर कर्मचारी वसाहत रोड क्रमांक आठ मूळ राहणार पिंगोरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे असे त्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अशोक शिर्के यांनी दिलेल्या माहितीनुसार वीज वितरण च्या कर्मचाऱ्याकडून मीटर बदलण्या कामासाठी लाच मागितली जात असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती प्रतिबंधक विभागाने सापळा रचून या तक्रारीची दि 8 रोजीपडताळणी केली असता त्यामध्ये तथ्य असल्याचे दिसले.
पोलीस निरीक्षक सचिन राऊत पोलीस अंमलदार संजय आडसूळ विनोद राजे संभाजी काटकर तुषार भोसले या पथकाने वीज वितरण शाखेच्या लक्ष्मीनगर येथील कार्यालयात एक हजाराची लाच घेताना गुरव यांना रंगेहात पकडले त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले असून पुढील चौकशीसाठी त्यांना सातारा येथे आणण्यात आले या कारवाईने वीज वितरण कर्मचाऱ्यांच्या वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.