
स्थैर्य, 22 मार्च, सातारा : सातारा शहरात सध्या गुढीपाडवा ते रामनवमी दरम्यान विविध भगवान राम मंदिरांमध्ये राम नवरात्राला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. प्रतापगंज पेठेतील आगटे परिवाराच्या श्री गोराराम मंदिरात या उत्सवानिमित्त केलेली आकर्षक विद्युत रोषणाई व देवाची विशेष पूजा विशेष लक्षवेधक ठरत आहे. दररोज शेकडो रामभक्त या रामरायाच्या दर्शनासाठी गर्दी करताना दिसून येत आहेत. ऐतिहासिक अशी लाकडाची सुरेख कोरीव काम केलेली देखणी ही भव्य मंदिराची वास्तू नजरेत भरणारी असून या ऐतिहासिक सौंदर्याची जपणूक आपटे परिवाराने अतिशय सुरेखरित्या केल्याचे कौतुक सर्वत्र होताना दिसत आहे. राम नवरात्रात धार्मिक उपक्रमांबरोबरच सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून मोठे रक्तदान शिबिर आयोजित करून विविध सेवाभावी उपक्रमांना आर्थिक मदतही केली जाते .(छाया – अतुल देशपांडे)
