सातारा जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २५ नोव्हेंबर २०२१ । सातारा । सातारा जिल्ह्यातील लोणंद कोरेगाव पाटण वडूज खंडाळा दहिवडी या सहा नगरपंचायती चा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे . या सहा नगरपंचायती साठी 21 डिसेंबर रोजी मतदान तर 22 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी ला सुरवात होणार आहे . या नगरपंचायतीना आचारसंहिता लागू झाली आहे.

याबाबतचे राज्य निवडणूक आयोगाचे अध्यादेश जिल्हाधिकारी कार्यालयाला बुधवारी सायंकाळी प्राप्त झाले . सहकार क्षेत्रातील निवडणुकांचा धुरळा खाली बसल्यावर राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 105 नगरपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम पहिल्या टप्प्यात हाती घेतला आहे . यामध्ये सातारा जिल्ह्यातील लोणंद कोरेगाव पाटण वडूज खंडाळा दहिवडी या नगरपंचायतीं चा समावेश असून या नगरपंचायती चा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने बुधवारी सायंकाळ पासूनच आचार संहिता लागू झाली आहे . राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी हे आदेश निर्गमित केले असून जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे आचारसंहिता लागू झाल्याचे आदेश त्या नगरपंचायतीना देण्यात आले .

निवडणूक कार्यक्रम परिशिष्ट एक प्रमाणे निर्देशित 29 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकार्यांनी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करून 30 नोव्हेंबर रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करावयाचा आहे . उमेदवारांना नामनिर्देशन पत्र 1 ते 7 डिसेंबर या दरम्यान ( 4 व5 डिसेंबर सुट्टीचे दिवस वगळून ) सकाळी 11 ते 3 या वेळेत दाखल करावयाचे आहे . नामनिर्देशन पत्रांची छाननी व अंतिम यादी 8 डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता प्रसिद्ध करण्यात येणार आहे . अर्ज माघारी 13 डिसेंबर रोजी व अर्ज माघारी इतर तांत्रिक कारणाचे अपिल असल्यास त्याची सुनावणी 16 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत होणार आहे . दि 14 डिसेंबर रोजी उमेदवारांना चिन्ह वाटप व अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे . त्यानंतर 21 डिसेंबर रोजी सकाळी साडेसात ते साडेपाच या वेळेत मतदान तर दिनांक 22 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे .

१ . नामनिर्देशन दाखल –

1 डिसेंबर ते 7 डिसेंबर – दुपारी ३ वाजेपर्यंत

2 अर्ज छाननी -8 डिसेंबर

३ अर्ज माघारी – 13 डिसेंबर – 3 वाजेपर्यंत

४ . चिन्ह वाटप – 14 डिसेंबर

५ . अपिल सुनावणी – 16 डिसेंबर

६ . मतदान – 21 डिसेंबर ( सकाळी 7.30 ते सायंकाळी 5:30)

७ . मतमोजणी – 22 डिसेंबर – सकाळी दहा वाजल्यापासून )


Back to top button
Don`t copy text!