११ सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १८ ऑक्टोबर २०२२ । सातारा । सातारा तालुक्यातील क वर्गातील सहकारी संस्थांच्या सन 2022-23  ते 2027-28 या कालावधीतील संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम   जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती तालुका सहकारी अधिकारी तथा सहायक निबंधक सहकारी संस्था, सातारा तालुका शंकर पाटील यांनी दिली आहे.

निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेल्या संस्था पुढीलप्रमाणे. शाकंभरीदेवी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, नागेवाडी, अहिल्यादेवी होळकर सहकारी पतसंस्था, सातारा, दि भैरवनाथ को ऑप क्रेडिट सोसायटी लि. वेचले, अजिंक्य नागरी सहकारी पतसंस्था, किडगाव, जयभवानी नागरी सहकारी पतसंस्था, सातारा, श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था, सातारा, क्रांतिपर्व नागरी सहकारी पतसंस्था, सातारा, मराठा सहकारी पतसंस्था, सातारा, अल्फालावल एम्पलॉईज सहकारी पतसंस्था, सातारा, प्राथमिक माध्यमिक विश्वविद्यालय शिक्षक-शिक्षकेत्तर सेवक सहकारी पतसंस्था, सातारा व आयटीआय कर्मचारी व प्रशिक्षणार्थी सहकारी ग्राहक संस्था, सातारा.


Back to top button
Don`t copy text!